महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Naresh Hiralal Beradiya
Naresh Hiralal Beradiya
पुणे, पुणे शहर
नमस्कार माझा नाव नरेश हिरालाल बेरडीया या वर्षी मी गणपती डेकोरेशन मध्ये नाशिक सिंहस्थ कुंभमेळा २०२७चा देखावा केला आहे . हे डेकोरेशन पर्यावरण पूरक आहे आणि बाप्पाची मूर्ती शाडू माती ची आहे. माझा उद्देश एकच आहे कि आपण पर्यावरण वाचवा म्हणून संपूर्ण डेकोरेशन मध्ये पर्यावरण पूरक वस्तूचा वापर केला आहे. गणपती बाप्प्पा मोरया (डेकोरेशन मधे पेपर, clay आणि sunboard चा वापर केला आहे. पत्ता : संजीवनी सोसायटी , श्रावस्ती नगर, घोरपडी गाव, पुणे ४११००१ mobil No. 8879046945
20/09/2026
गणपती बाप्पा - शुभम वाघ
शुभम वाघ
पुणे, पुणे शहर
आमच्या घरातले गणेशोत्सवाचे १२ वे वर्ष असल्या कारणे १२ ज्योतिर्लिंग पैकी प्रमुख ज्योतिर्लिंग म्हणजेच केदारनाथ साकारण्याचे प्रयत्न केला आहे. आरास पूर्णपणे घरगुती आणि पर्यावरणपूरक बनवण्यात आली आहे.
20/09/2026
गणपती बाप्पा - चेतन शरद राणे
चेतन शरद राणे
मुंबई उपनगर, अंधेरी
यंदाच्या गणपती सजावटीची संकल्पना माती, साधेपणा आणि सर्जनशीलता यावर आधारित आहे. पारंपारिक मातीच्या वस्तू जसे की चहा, लस्सी चे कुल्हड आणि मातीची भांडी सजावटीसाठी वापरली आहेत. या मातीच्या कुल्लडची मांडणी करण्यासाठी डक्टिंग कामासाठी वापरल्या जाणाऱ्या धातूंच्या सळीचा उपयोग केला आहे. मातीच्या नैसर्गिक गुणधर्मामुळे सजावटीला आकर्षक रचना साकार झाली आहे. सजावटीच्या मध्यभागी शाडूच्या माती पासून बनलेले आपले लाडके बाप्पा बाल गणेश रुपात विराजमान आहेत. रोजच्या वापरातील साध्या वस्तूंना कलात्मक रूप देत ही सजावट
20/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Rohan Deokate
Rohan Deokate
पुणे, पुणे शहर
आमच्या घरातील गौरी गणपती…देखावा रामसेतू
20/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Pooja Patil
Pooja Patil
पुणे, पिंपरी चिंचवड
आळंदीच्या इंद्रायणीवर आधारित इको-फ्रेंडली देखावा - शाडूच्या मातीचा हाताने घडवलेला बाप्पा, आळंदी देवस्थानाची प्रतिकृती आणि प्रदूषणाने भरलेली इंद्रायणी... एकीकडे मानवाने टाकलेला कचरा, प्लास्टिक, निर्माल्याने गटार झालेली नदी, आणि दुसरीकडे बाप्पाचे प्रिय उंदीरमामा हातात झाडू घेऊन ती स्वच्छ करत आहेत. हा देखावा सांगतो, घाण करणारे आपणच आणि स्वच्छतेची जबाबदारीही आपलीच आहे. *टॅगलाईन :* *"घाण केली मानवाने, झाडू हाती घेतला उंदिरमामाने!"*
20/09/2026
गणपती बाप्पा - archana pawar
archana pawar
मुंबई उपनगर, अंधेरी
आणि यंदा आम्ही साकारली आहे पुरातन, शिव-कालीन पाषाणी मंदिराच्या गाभाऱ्याची प्रतिकृती. 'विघ्नहर्ता' भगवान गणेशाला महादेवाच्या साक्षीने विराजमान करण्यात आले आहे, जे एकाच वेळी समृद्धी आणि अध्यात्माचे प्रतीक आहे. ​गाभारा आणि डेकोरेशनच्या भिंतींवर कृत्रिम पाषाणी विटांचे काम करून पुरातन मंदिराचा लूक दिला आहे. उजव्या बाजूला एक दगडांची भिंत' आणि त्यावर पसरलेल्या 'विहंगम वटवृक्षाच्या पारंब्या' निसर्गाशी नाते जोडतात. हे सर्व जुने न्यूजपेपर , बॉक्सेस , वडाच्या पारंब्या, हॅडमेड पेपर यापासून बनवले आहे
20/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - हर्ष वाणी
हर्ष वाणी
जळगाव, भुसावळ
यंदाच्या गणेशोत्सवात आम्ही साकारले आहे श्री पद्मनाभस्वामी मंदिराची भव्य eco-friendly प्रतिकृती, ज्यामध्ये भगवान पद्मनाभस्वामी, अनंतशेष आणि गूढ Vaults मधील ऐतिहासिक खजिन्याची झलक साकारली आहे. २०११ मधील तिजोऱ्यांच्या पाहणीपासून प्रेरणा घेत, खजिन्याची पाहणी करणारे miniature पथकही या सजावटीत दाखवले आहे. ही संपूर्ण सजावट पर्यावरणपूरक आणि पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्यापासून हाताने तयार करण्यात आली आहे. सोबत तेथील दरवाजे व खजिन्याची प्रतिकृती उभारली आहे.
20/09/2026
गणपती बाप्पा - Shipra Rode
Shipra Rode
पालघर, वसई
पुरातन मंदिर – पर्यावरणपूरक गणेश सजावट “पुरातन मंदिर” या संकल्पनेवर आधारित ही सजावट पारंपरिक मंदिराची भव्यता, निसर्ग आणि आध्यात्मिक शांतता यांचा सुंदर संगम आहे. दगडी भिंती, गाभारा, प्रवेशद्वार, दीपमाळ, जलप्रवाह व आकाशदृश्यातून प्राचीन मंदिराचे भक्तिमय वातावरण साकारले आहे. कार्डबोर्ड, वर्तमानपत्रे, ज्यूटची दोरी, कागदी प्लेट्स व पुनर्वापरित वस्तूंचा वापर करून प्लास्टिक पूर्णपणे टाळले आहे. सजावटीतील सर्व रोपे घरात वाढवलेली आहेत. ही निर्मिती परंपरा, सर्जनशीलता व पर्यावरणसंवर्धनाचा संदेश देते.
20/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Nitin Vijay Bhujbal
Nitin Vijay Bhujbal
पुणे, हवेली
आम्ही पर्यावरण पूरक गौरी आणि गणपती बाप्पा सजावट केली आहे. यामध्ये जगद्गुरू श्री. संत तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळा हा हलता देखावा साजरा करण्यात आला आहे. तसेच तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्रायणी नदी मध्ये बुडवला आणि रुक्मिणी देवीने बुडालेल्या गाथा परत माघारी देत असताना चा सुंदर क्षण दाखवला आहे तसेच गाथा मंदिर इंद्रायणी नदी भंडारा डोंगर आणि तुकाराम बीज ला हलणारे नादुरकी झाड दाखवलेले आहे
20/09/2026
गणपती बाप्पा - Vivek Bapuraoji Ghangare
Vivek Bapuraoji Ghangare
वर्धा, वर्धा
साधी पर्यावरण पूरक सजावट शाडू मातीची मूर्ती साधी सजावट गणपती बाप्पा मोरया.. 🙏🙏
20/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Suraj Nivale
Suraj Nivale
नांदेड, नांदेड
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
19/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - rajesh naik
rajesh naik
सिंधुदुर्ग, वेंगुर्ला
पावनखिंड मोहिम दिखावा सादर केला आहे.शिवाजी महाराज पावनखिंड मोहिम कशी पत्ते केली.
19/09/2026
GPS सत्यापित
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - Naresh Hiralal Beradiya
पुणे, पुणे शहर
नमस्कार माझा नाव नरेश हिरालाल बेरडीया या वर्षी मी गणपती डेकोरेशन मध्ये नाशिक सिंहस्थ कुंभमेळा २०२७चा देखावा केला आहे . हे डेकोरेशन पर्यावरण पूरक आहे आणि बाप्पाची मूर्ती शाडू माती ची आहे. माझा उद्देश एकच आहे कि आपण पर्यावरण वाचवा म्हणून संपूर्ण डेकोरेशन मध्ये पर्यावरण पूरक वस्तूचा वापर केला आहे. गणपती बाप्प्पा मोरया (डेकोरेशन मधे पेपर, clay आणि sunboard चा वापर केला आहे. पत्ता : संजीवनी सोसायटी , श्रावस्ती नगर, घोरपडी गाव, पुणे ४११००१ mobil No. 8879046945
Naresh Hiralal Beradiya 20/09/2026
गणपती बाप्पा - शुभम वाघ
पुणे, पुणे शहर
आमच्या घरातले गणेशोत्सवाचे १२ वे वर्ष असल्या कारणे १२ ज्योतिर्लिंग पैकी प्रमुख ज्योतिर्लिंग म्हणजेच केदारनाथ साकारण्याचे प्रयत्न केला आहे. आरास पूर्णपणे घरगुती आणि पर्यावरणपूरक बनवण्यात आली आहे.
शुभम वाघ 20/09/2026
गणपती बाप्पा - चेतन शरद राणे
मुंबई उपनगर, अंधेरी
यंदाच्या गणपती सजावटीची संकल्पना माती, साधेपणा आणि सर्जनशीलता यावर आधारित आहे. पारंपारिक मातीच्या वस्तू जसे की चहा, लस्सी चे कुल्हड आणि मातीची भांडी सजावटीसाठी वापरली आहेत. या मातीच्या कुल्लडची मांडणी करण्यासाठी डक्टिंग कामासाठी वापरल्या जाणाऱ्या धातूंच्या सळीचा उपयोग केला आहे. मातीच्या नैसर्गिक गुणधर्मामुळे सजावटीला आकर्षक रचना साकार झाली आहे. सजावटीच्या मध्यभागी शाडूच्या माती पासून बनलेले आपले लाडके बाप्पा बाल गणेश रुपात विराजमान आहेत. रोजच्या वापरातील साध्या वस्तूंना कलात्मक रूप देत ही सजावट
चेतन शरद राणे 20/09/2026
गणपती बाप्पा - Rohan Deokate
पुणे, पुणे शहर
आमच्या घरातील गौरी गणपती…देखावा रामसेतू
Rohan Deokate 20/09/2026
गणपती बाप्पा - Pooja Patil
पुणे, पिंपरी चिंचवड
आळंदीच्या इंद्रायणीवर आधारित इको-फ्रेंडली देखावा - शाडूच्या मातीचा हाताने घडवलेला बाप्पा, आळंदी देवस्थानाची प्रतिकृती आणि प्रदूषणाने भरलेली इंद्रायणी... एकीकडे मानवाने टाकलेला कचरा, प्लास्टिक, निर्माल्याने गटार झालेली नदी, आणि दुसरीकडे बाप्पाचे प्रिय उंदीरमामा हातात झाडू घेऊन ती स्वच्छ करत आहेत. हा देखावा सांगतो, घाण करणारे आपणच आणि स्वच्छतेची जबाबदारीही आपलीच आहे. *टॅगलाईन :* *"घाण केली मानवाने, झाडू हाती घेतला उंदिरमामाने!"*
Pooja Patil 20/09/2026
गणपती बाप्पा - archana pawar
मुंबई उपनगर, अंधेरी
आणि यंदा आम्ही साकारली आहे पुरातन, शिव-कालीन पाषाणी मंदिराच्या गाभाऱ्याची प्रतिकृती. 'विघ्नहर्ता' भगवान गणेशाला महादेवाच्या साक्षीने विराजमान करण्यात आले आहे, जे एकाच वेळी समृद्धी आणि अध्यात्माचे प्रतीक आहे. ​गाभारा आणि डेकोरेशनच्या भिंतींवर कृत्रिम पाषाणी विटांचे काम करून पुरातन मंदिराचा लूक दिला आहे. उजव्या बाजूला एक दगडांची भिंत' आणि त्यावर पसरलेल्या 'विहंगम वटवृक्षाच्या पारंब्या' निसर्गाशी नाते जोडतात. हे सर्व जुने न्यूजपेपर , बॉक्सेस , वडाच्या पारंब्या, हॅडमेड पेपर यापासून बनवले आहे
archana pawar 20/09/2026
गणपती बाप्पा - हर्ष वाणी
जळगाव, भुसावळ
यंदाच्या गणेशोत्सवात आम्ही साकारले आहे श्री पद्मनाभस्वामी मंदिराची भव्य eco-friendly प्रतिकृती, ज्यामध्ये भगवान पद्मनाभस्वामी, अनंतशेष आणि गूढ Vaults मधील ऐतिहासिक खजिन्याची झलक साकारली आहे. २०११ मधील तिजोऱ्यांच्या पाहणीपासून प्रेरणा घेत, खजिन्याची पाहणी करणारे miniature पथकही या सजावटीत दाखवले आहे. ही संपूर्ण सजावट पर्यावरणपूरक आणि पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्यापासून हाताने तयार करण्यात आली आहे. सोबत तेथील दरवाजे व खजिन्याची प्रतिकृती उभारली आहे.
हर्ष वाणी 20/09/2026
गणपती बाप्पा - Shipra Rode
पालघर, वसई
पुरातन मंदिर – पर्यावरणपूरक गणेश सजावट “पुरातन मंदिर” या संकल्पनेवर आधारित ही सजावट पारंपरिक मंदिराची भव्यता, निसर्ग आणि आध्यात्मिक शांतता यांचा सुंदर संगम आहे. दगडी भिंती, गाभारा, प्रवेशद्वार, दीपमाळ, जलप्रवाह व आकाशदृश्यातून प्राचीन मंदिराचे भक्तिमय वातावरण साकारले आहे. कार्डबोर्ड, वर्तमानपत्रे, ज्यूटची दोरी, कागदी प्लेट्स व पुनर्वापरित वस्तूंचा वापर करून प्लास्टिक पूर्णपणे टाळले आहे. सजावटीतील सर्व रोपे घरात वाढवलेली आहेत. ही निर्मिती परंपरा, सर्जनशीलता व पर्यावरणसंवर्धनाचा संदेश देते.
Shipra Rode 20/09/2026
गणपती बाप्पा - Nitin Vijay Bhujbal
पुणे, हवेली
आम्ही पर्यावरण पूरक गौरी आणि गणपती बाप्पा सजावट केली आहे. यामध्ये जगद्गुरू श्री. संत तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळा हा हलता देखावा साजरा करण्यात आला आहे. तसेच तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्रायणी नदी मध्ये बुडवला आणि रुक्मिणी देवीने बुडालेल्या गाथा परत माघारी देत असताना चा सुंदर क्षण दाखवला आहे तसेच गाथा मंदिर इंद्रायणी नदी भंडारा डोंगर आणि तुकाराम बीज ला हलणारे नादुरकी झाड दाखवलेले आहे
Nitin Vijay Bhujbal 20/09/2026
गणपती बाप्पा - Vivek Bapuraoji Ghangare
वर्धा, वर्धा
साधी पर्यावरण पूरक सजावट शाडू मातीची मूर्ती साधी सजावट गणपती बाप्पा मोरया.. 🙏🙏
Vivek Bapuraoji Ghangare 20/09/2026
गणपती बाप्पा - Suraj Nivale
नांदेड, नांदेड
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Suraj Nivale 19/09/2026
गणपती बाप्पा - rajesh naik
सिंधुदुर्ग, वेंगुर्ला
पावनखिंड मोहिम दिखावा सादर केला आहे.शिवाजी महाराज पावनखिंड मोहिम कशी पत्ते केली.
rajesh naik 19/09/2026
गणपती बाप्पा - Akshay ramakant utekar
रायगड, खालापूर
आमच्या घरचा गणपती बाप्पा आणि साजावट.
Akshay ramakant utekar 19/09/2026
गणपती बाप्पा - Narayan Mangalaram
अहिल्यानगर, अहिल्यानगर
आमच्या घरी श्री गणेशाच्या आगमनासाठी पर्यावरण पूरक आणि टाकावू पासून टिकवू करण्यासाठी हाताने बनवलेली दीपमाळ बनवली आहे. यातून आम्ही आम्ही टाकावू पासून टिकवू वस्तू बनवणे आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे....!!
Narayan Mangalaram 19/09/2026
गणपती बाप्पा - Pramod D Beedkar
जालना, अंबड
गणपती बाप्पा मोरया! मंगल मुर्ती मोरया!
Pramod D Beedkar 19/09/2026
गणपती बाप्पा - Anirudha Jumbad
जालना, जालना
आमच्या घरी आयर्नमॅन ट्रायथलॉन (Ironman Triathlon) संकल्पनेवर आधारित गणपती बाप्पाची खास मूर्ती आहे, ज्यामध्ये बाप्पा सायकलवर/धावण्याच्या आणि क्रीडा अवतारात दिसत आहेत. सोबतच हाताने बनवलेली क्रीडावेशातील गणपतीची अनोखी मूर्ती आणि त्यावर छोटा भारतीय राष्ट्रध्वज (तिरंगा) देखील लावला आहे.
Anirudha Jumbad 19/09/2026
गणपती बाप्पा - कुंदन काशीनाथ दिवेकर
ठाणे, ठाणे
फक्त पर्यावरण पुरक लाल मातीची गणेश मूर्ती २१ इंच
कुंदन काशीनाथ दिवेकर 19/09/2026
गणपती बाप्पा - Harsh Ajay Shahu
नागपूर, नागपूर शहर
Samudra Manthan
Harsh Ajay Shahu 19/09/2026
गणपती बाप्पा - बळीराम श्रीपतराव जामदरे
जालना, अंबड
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
बळीराम श्रीपतराव जामदरे 19/09/2026
गणपती बाप्पा - श्री सागर पवार
धुळे, धुळे
श्री गणेशोत्सव भक्तीभावाने व पर्यावरणपूरक संकल्पनेतून साजरा करण्यात आला. मंडळाच्या देखाव्यामध्ये साधेपणा, स्वच्छता आणि नैसर्गिक साहित्य, हिरवळ, कुंडीतील झाडे, ज्यूटचा वापर, पुनर्वापरयोग्य सजावटीचे माध्यमातून “हरित उत्सव – स्वच्छ पर्यावरण” ही संकल्पना मांडण्यात आली.
श्री सागर पवार 19/09/2026